आदित्य ठाकरे यांचा उद्या खान्देशात झंझावात; भडगाव, अमळनेर, कासोद्यात जाहीर सभा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे हे गुरुवारी खान्देश दौर्‍यावर येत आहेत. भडगाव, अमळनेर तसेच कासोदा येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांचे गुरुवारी सकाळी जळगावात आगमन होणार असून शहरातील सुभाष चौकात दुपारी 12 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर तालुक्यातीलच शिरसोली येथे दुपारी 2 वाजता, तर एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे दुपारी 4 वाजता सभा होईल. सायंकाळी 6 वाजता भडगाव येथे जाहीर सभा होणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभांच्या निमित्ताने खान्देशात भगवेमय वातावरण तयार झाले असून जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शहरप्रमुख शरद तायडे, माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आदींच्या उपस्थितीत सभांच्या नियोजनासाठी बैठका घेण्यात आल्या आहेत.