आदित्य ठाकरे बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर; अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करणार

गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका बसला आहे. या भागात अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख,आमदार आदित्य ठाकरे उद्या बुधवारी (ता. 4) मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत

मराठवाड्यात नांदेड, कळनुमरी,परभणी, पाथरी, बदनापूर या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांची ते पाहणी करणार आहेत. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहे. या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीला मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या जोणून घेण्यासाठी बुधवारी आदित्य ठाकरे मराठवाड्यात येणार आहेत.