निर्दयी घटनाबाह्य मुख्यमंत्री, थोडी लाज ठेवून तरी शेतकऱ्यांना मदत करा; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारे आणि पावसाने हजारो हेक्टरवरील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यानंतर युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला. पण शेतकऱ्यांना अद्याप सरकारची कुठलीही मदत न मिळाल्याने आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. थोडी लाज ठेवून तरी शेतकऱ्यांना मदत करा, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. काल मराठवाड्यात बांधावर जाऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. आमचा दौरा जाहीर झाल्यावर मिंधे राजवटीने पंचनाम्याचे आदेश दिले. पण प्रक्रिया मात्र हळू चालू आहे, असे आदित्य ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले.