खरतर हीच ती गद्दार वृत्ती! आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारवर हल्लाबोल

मराठा आरक्षणावरील चर्चेनंतर राज्य सरकारची भूमिका मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला येतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं’ असं बोलताना दिसत आहे. त्यावरून राज्य सरकारमध्ये मराठा आरक्षण प्रश्नी अनास्थाच दिसत असल्याची टीका होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

या व्हिडीओ वरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ”बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं! – घटनाबाह्य मुख्यमंत्री. ही यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशिलता? खरतर हीच ती गद्दार वृत्ती! गेलं दीड वर्ष महाराष्ट्र या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेतंय. या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का? तुरुंगात जायचं नाही आणि मुख्यमंत्री पदावर बसायचं म्हणून ज्यांनी यांना घडवलं, वाढवलं, पदं दिली, सत्ता दिली त्यांचे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार??? दुर्दैव आहे आमच्या राज्याचं की गद्दारी करून हे असलं खोके-धोके सरकार महाराष्ट्रातल्या नागरिकांवर लादलं गेलंय!” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केली आहे.