हटवलेल्या आयुक्तांना मिंधे सरकार बढती देणार का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पदावरून हटवले. त्यांच्यासोबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्याही बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी राज्य सरकारने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यानुसार मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आयुक्तपदाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी खोके सरकारला फटकारले आहे.

”भाजप पुरस्कृत खोके सरकार महानगरपालिकेच्या भ्रष्ट आयुक्तांवर किती प्रेम करते हे धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाला शेवटी त्यांची हकालपट्टी करावी लागली आणि तरीही सरकारने त्यांच्या जागी कुणालाही नेमलेले नाही. आता त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवणार की दिल्लीला पाठवणार? गेल्या 2 वर्षात मुंबईची ज्या प्रकारे लूट झाली आहे, ते पाहता भाजप-मिंधे सरकार त्यांच्या प्रमोशनची नक्की शिफारस करेल”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे”,