नागपूरला येथून गुजरातमधील वडोदऱ्यात हलविण्यात आलेला सी -295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पाचे सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सॅनचेझ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे भाजप सरकारला फटकारले आहे.
महाराष्ट्रात निवडणुका आहेत.
हा तोच प्लांट आहे ज्यासाठी महाराष्ट्र म्हणून आपण सर्व प्रयत्नशील होतो. नागपूर इथे हा प्लांट आला असता, पण भाजपने ढकलला दुसऱ्या राज्यात! माहितीये कुठे?असे उद्योग तिथे पाठवून, आज हाच महाराष्ट्रद्वेष भाजपाच्या मनात साजरा होतोय आणि इथे एकनाथ शिंदे हे…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 28, 2024
आदित्य ठाकरे यांनी या उद्घाटनाची बातमी शेअर करत मिंधे भाजप सरकारवर निशाणा साधला. ”महाराष्ट्रात निवडणुका आहेत. हा तोच प्लांट आहे ज्यासाठी महाराष्ट्र म्हणून आपण सर्व प्रयत्नशील होतो. नागपूर इथे हा प्लांट आला असता, पण भाजपने ढकलला दुसऱ्या राज्यात! माहितीये कुठे? असे उद्योग तिथे पाठवून, आज हाच महाराष्ट्रद्वेष भाजपाच्या मनात साजरा होतोय आणि इथे एकनाथ शिंदे हे सुरतला ‘Thank You’ म्हणतायत. यामुळेच आपल्याला परिवर्तन घडवायचंय’, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.