भाजपने वन नेशन वन इलेक्शनबद्दल बोलणं हा तर जोकच, आदित्य ठाकरे यांची बोचरी टीका

One Nation One Election च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आल्याचे समजते. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला फटकारले आहे. ”जी भाजपचा महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणूका घेऊ शकत नाही, चार राज्यात निवडणूका घेऊ शकत नाही त्यांनी वन नेशन वन इलेक्शनबद्दल बोलणं हा तर जोकच आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

”हे इलेक्शन कमिशन लवकरच कपिल शर्मा शो चालवणार आहे. कारण ते एका बाजूला जम्मू कश्मीर व हरयाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाही असं सांगतात. जम्मू कश्मीरमध्ये टप्प्याटप्प्यात निवडणूक घेत आहेत. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकाच्या निवडणूका झालेल्या नाहीत आणि हे वन नेशन वन इलेक्शनचं बोलत आहेत. जी भाजपचा महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणूका घेऊ शकत नाही, चार राज्यात निवडणूका घेऊ शकत नाही त्यांनी वन नेशन वन इलेक्शनबद्दल बोलणं हा तर जोकच आहे. हे सर्व काय कसं होणार याबाबत कुठेही स्पष्टता नाही. भाजपला निवडणूका घ्यायची हिंमतच नाही. कारण भाजपला हे 100 टक्के माहित आहे की ते सर्व निवडणूका हरणार आहेत. हरायचं नाही म्हणून निवडणूका घ्यायच्या नाही. हे लोकशाहीला व संविधानाला हानीकारक आहे” असे आदित्य ठाकरे म्हणाले.