भाजपनं तरुणांचं वाटोळं केलं; बेरोजगारीच्या प्रश्नावरून आदित्य ठाकरे बरसले

एअर इंडियाच्या 600 जागांसाठी मंगळवारी भरती आयोजित करण्यात आली होती. मात्र अवघ्या 600 जागांसाठी तब्बल 25 हजाराहून अधिक तरुण एअर इंडियाच्या कार्यालयात पोहोचले होते. भर पावसात वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या तरुण नोकरीच्या आशेने एअर इंडियाा कार्यालयाबाहेर जमा झाले होते. या घटनेच्या व्हिडीओवरून देशातील बेरोजगारीचे भीषण वास्तव दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदारा आदित्य ठाकरे यांनी भाजपला फटकारले आहे. ”आपल्या देशातील रोजगाराची अवस्था दयनीय आहे. 600 नोकऱ्यांसाठी 25 हजार जण नोकरीच्या शोधत आले. भाजपने आपल्या देशातील तरुणांचं वाटोळं केलं आहे. आपल्या तरुणांना रोजगारापासून दूर ठेवून फूट पाडण्याच्या कामांमध्ये गुंतवून ठेवण्याची त्यांची खेळी आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या ‘ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड’ मध्ये 12 जुलै ते 16 जुलै दरम्यान विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. 16 जुलैला अखेरच्या दिवशी हँडीमन च्या 600 पदांसाठी 20 ते 30 हजार उमेदवारांची तुडुंब गर्दी झाली होती. अशा प्रचंड गर्दीमुळे एअर इंडियाच्या व्यवस्थापनावर केवळ फॉर्म जमा करून घेण्याची नामुष्की ओढवली. व्यवस्थापनाच्या चुकीच्या नियोजनमुळे महाराष्ट्रासह विविध राज्यातून आलेल्या गरीब बेरोजगार तरुणांना केवळ फॉर्म जमा करण्यासाठी मानसिक त्रास व हजारो रुपये भूर्दंड सहन करावा लागला.