बेळगावमधला मराठी माणूस या सरकारचा लाडका आहे की नाही हे सांगावे, आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल

मराठी भाषिक चळवळीच्या लढ्याचे केंद्र असलेल्या बेळगाव जिह्यात होणाऱ्या महाराष्ट्र एकिकरण समितीच्या महामेळाव्यास कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. तसेच बेळगावला जाणाऱ्या शिवसैनिकांना देखील पोलिसांनी रोखले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

” या सरकारने लाडकी बहिण असेल तसेच सगळ्यांना खोटे वादे केले होते. या सरकारने सांगावं की बेळगावमधला आपला मराठी माणूस हा त्यांचा लाडका आहे की नाही, आज जे सरकार स्वत:ला महाराष्ट्राचं सरकार म्हणत आहे ते खरंतर ईव्हीएमचे सरकार आहे त्या सरकारने आम्हाला उत्तर दिलं पाहिजे की बेळगावमध्ये मराठी माणसावर अत्याचार होत आहेत त्यावर त्यांचं काय म्हणनं आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.