घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या अपयशाची पाहणी करत आहेत! मिंध्यांच्या रस्ते पाहणीवरून आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबईतील रस्त्यांच्या क्राँकिटीकरणाचे काम आपल्या कंत्राटदार मित्रांना देऊन मुंबई खड्डय़ात घालणारे आणि वर त्यात हजारो कोटींचा घोटाळा झाल्यानंतरही कारवाई न करणाऱया मुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा तोफ डागली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईतील काही रस्त्यांची अपूर्ण कामे, होणारी वाहतूककोंडी आणि मुंबईकरांचे हाल या अपयशाची पाहणी केली आहे, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर आणि वरळीतील रस्ते काँक्रिटीकरणाची पाहणी केली. या पाहणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या पाहणी दौऱयातील पह्लपणावर जोरदार हल्लाबोल केला. ‘स्वतःचे अपयश पहायला गेलेले कॉण्ट्रक्टर मंत्री! 6080 कोटींच्या रस्ते घोटाळ्याचा भंडापह्ड मी मागच्या वर्षी केला होता. अजूनही मुंबई महापालिका एकही रस्ता पूर्ण करू शकली नाहीये आणि आज घटनाबाह्य मुख्यमंत्री याच त्यांच्या अपयशाची पाहणी करत आहेत,’ अशी जळजळीत टीका आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर केली.