आदित्य ठाकरे यांचा झंझावात पश्चिम महाराष्ट्रात; आज आणि उद्या राधानगरी, कोल्हापूर, हातकणंगले, पाटणमध्ये मेळावे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या जाहीर मेळाव्यांचा झंझावात महाराष्ट्रात सुरू झाला आहे. 9 जानेवारी आणि 10 जानेवारी रोजी पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सातारा जिह्यांमध्ये आदित्य ठाकरे यांचे चार मेळावे होणार आहेत.

आता आपलाच झंझावात, संपूर्ण महाराष्ट्रात… असा नारा देत आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. विधानसभा मतदार संघनिहाय त्यांचे मेळावे होत आहेत. 9 जानेवारी रोजी कोल्हापूरच्या राधानगरी आणि कोल्हापूर शहर विधानसभा क्षेत्रात आदित्य ठाकरे यांचे मेळावे होणार आहेत. 10 जानेवारी रोजी कोल्हापूरच्या हातकणंगले विधानसभा क्षेत्रात त्यांचा मेळावा होईल. नंतर सातारा येथील पाटण विधानसभा क्षेत्रात त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.