आज गिरगावात शिवसैनिकांचा मेळावा; आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार

शिवसेनेचा झंझावात आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत आहे. उद्या त्याची सुरुवात गिरगावपासून होतेय. गिरगावातील फणसवाडी, ठाकूरद्वार येथे सायंकाळी 6 वाजता शिवसैनिकांचा मेळावा होणार असून या मेळाव्याला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यानंतर महाराष्ट्रभर शिवसैनिकांच्या मेळाव्यांचा झंझावात सुरू होणार आहे. निष्ठा आणि न्यायाच्या परिसीमा या मेळाव्यांतून अधोरेखित होणार आहेत. शिवसेनेचे नेते, उपनेते आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

स्थळ – ठाकूरद्वार
वेळ – सायंकाळी 6 वाजता