BEST ची दरवाढ नाही, हा आहे आपला IMPACT!; आदित्य ठाकरे यांचा BMC ला दणका

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना मंगळवारी पत्र लिहिले होते. या पत्रानंतर मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासन ताळ्यावर आले आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच ‘हा आहे आपला IMPACT!’ असे म्हणत मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारला टोला लगावला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यांनी बेस्ट बससेवा दरवाढीच्या मुद्द्यावर ट्विट केले आहे. ‘अनेक वर्ष बेस्ट ही ‘सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त सेवा’ अशी ओळख असणारी सेवा होती. मिंधे भाजपच्या राजवटीत महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्यातच अजून एक म्हणजे ‘बेस्ट’ कमजोर करून, अर्थसहाय्य बंद करणे, दरवाढ करणे. मी पत्र देताच ‘बेस्ट’ ने आता दरवाढ नाही करणार असे सांगितले आहे. हा आहे आपला IMPACT!’ असे आदित्य ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले.