आधी राम मंदिराची गळती, आता बाणगंगेच्या पायऱ्यांची तोडफोड… भाजप पराभवाचा सूड घेतोय? आदित्य ठाकरे यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना केली. श्रीरामाच्या नावाने राजकारण केलं. पण श्रीरामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपा अयोध्येतच सपाटू पराभव झाला. राजकीय लाभ मिळवण्यासाठी घाईघाईने श्रीराम मंदिराचे उद्घाटन केल्याने आता त्याचे परिणाम समोर येत आहेत. पहिल्यात पावसात श्रीराम मंदिराला गळती लागल्याचे समोर आले आहे. अयोध्येतील हा प्रकार समोर आल्यानंतर मुंबईतील प्राचीन आणि ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावावर भाजपने वक्रदृष्टी फिरवली आहे. यावरून शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

मुंबई महापालिकेविरोधात FIR दाखल

मुंबईतील 11 व्या शतकातील ऐतिहासिक असा बाणगंगा तलाव प्रसिद्ध आहे. दिवाळीत बाणगंगा तलावावर मोठो दिपोत्सव साजरा केला जातो. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. हा बाणगंगा तलाव मुंबईची ओळख आहे. अशा बाणगंगा तलावाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटदाराने जेसीबी वापर केल्याने पायऱ्यांचे मोठे आणि दुरुस्त न होणारे असे नुकसान झाले आहे. या प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे. पुरातत्व विभागाने या घटनेची गंभीर दखल हे मुंबई महापालिकेला जाब विचारला आहे. बाणगंगा एक ऐतिहासिक ठिकाण असून तिथे जेसीबी चालवून पायऱ्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. जीएसबी मंडळाच्या ताब्यात हा बाणगंगा तलाव आहे आणि त्यांच्या देखरेखीखाली जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या प्रकरणी आता मुंबई महापालिकेविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

‘कंत्राटदाराला ताबडतोब अटक करा’

पुरातत्व विभागाने मुंबई महापालिकेविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर बीएमसीचे कानही पिरगाळले आहेत. प्राचीन पायऱ्यांचे आणि तेथील ठिकाणाचे किती नुकसान झाले आहे? याचा सविस्तर अहवाल सादर करा, असे निर्देशही पुरातत्व विभागाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

दरम्यान, या प्रकरणी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत कंत्राटदाराला ताबडतोब अटक करण्याची मागणी केली आहे. ‘हे धक्कादायक असून संबंधित कंत्राटदाराला सरकारने ताबडतोब अटक केली पाहिजे. प्रभू श्रीरामाचा वास असलेली प्रत्येक जागा गमावल्याने भाजपने हा सूड उगवला आहे का? अयोध्या मंदिराच्या (राजकीय फायद्यासाठी घाईघाईत उद्घाटन झाले) छताला गळती आहे. ड्रेनेजची व्यवस्था नाही आणि आता हे सत्ताधारी व त्यांचे कंत्राटदार बाणगंगा तलावाचेही नुकसान करत आहेत’, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केला.