उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांनी वरळीतून भरला अर्ज

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वरळी मतदारसंघातून  उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. भव्य मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आदित्य ठाकरे यांचे वरळीकरांनी ठिकठिकाणी  जल्लोषात स्वागत केले.

‘मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार’ असे विजयाचे ब्रीदवाक्य लिहिलेल्या ओपन ट्रकमधून आदित्य ठाकरे नागरिकांना अभिवादन करत वरळीच्या दिशेने निघाले. ट्रकवर शिवसेनेची मशाल निशाणी लावण्यात आली होती आणि ‘आपली वरळी, आपला आदित्य’ असे होर्डिंगही होते.

लीडचा विचार मी करत नाही, वरळीच्या विकासाला माझे प्राधान्य होते आणि राहील. समोर कुणीही असला तरी आम्ही दिल से लढत आहोत. महाराष्ट्राला आता महाविकास आघाडीच हवी आहे! – आदित्य ठाकरे