युनोस्कोचे पथक करणार किल्ले प्रतापगडाची पाहणी, 4 ऑक्टोबरच्या दौऱ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील तसेच अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेली ऐतिहासिक वास्तू असलेल्या किल्ले प्रतापगड येथे 4 ऑक्टोबरला युनेस्कोचे पथक भेट देऊन पाहणी करणार आहेत. या संभाव्य दौऱयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली असून, संबंधित विभागांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रतापगडाच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीतील समावेशाचा मार्ग सुकर होणार आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 11 व तामीळनाडूमधील जिंजीच्या किल्ल्याचा जागतिक वारसास्थळ यादीत समावेश करावा, असा प्रस्ताक युनेस्कोला पाठवला आहे. या यादीत सातारा जिह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. गेल्या 350 वर्षांहून अधिक काळापासून ताठ मानाने हा किल्ला उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याचा लवकरच जागतिक वारसास्थळांत समावेश होणार आहे. युनेस्कोचे पथक प्रतापगडाची पाहणी करण्यासाठी दोन दिवसीय दौऱयाकर येणार आहे. दि. 3 आक्टोबर रोजी हे पथक जिह्यात येणार असून, यात विविध देशांतील तज्ञ अधिकाऱयांची टीम, राज्य व जिल्हा समिती असे पथक पाहणी करणार आहे.

दौऱयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली असून, त्यांनी संबंधित विभागाकडून आढावा घेतला आहे. यावेळी स्वच्छता, घनकचरा, किल्ल्याकरील मुख्य दरवाजा, चोरवाट, स्थानिक हॉकर्स, मशाल महोत्सव माहिती, सुशोभीकरण कामे, किल्ल्याकर वेगवेगळे असणारे सात पॉइंट्स याबाबत सूचना केल्या.

n युनेस्कोने वारसा स्थळांच्या यादीत प्रतापगडाचा समावेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची नव्याने जगाला ओळख होईल. त्यासोबत युनेस्को शास्त्रशुद्ध पद्धतीने किल्ले संवर्धनासाठी मदत करू शकेल. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन केले तर इतिहासातले नवे दुवे सापडू शकतील, अशी माहिती पुरातत्व विभागाकडून देण्यात आली. तसेच किल्ले प्रतापगड येथून पाहणी झाल्यानंतर ही टीम छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असणाऱया बारा किल्ल्यांच्या प्रतिकृतीची पाहणी करणार आहेत.

महाराष्ट्रात भ्रमंती

n केंद्र सरकारने महाराष्ट्रातील प्रतापगडासह शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, साल्हेर, सुकर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे अकरा तसेच जिंजी किल्ल्यांचा समावेश जागतिक यादीत करण्यासंदर्भातील प्रस्ताव युनेस्कोला सादर केला आहे. त्याअनुषंगाने युनेस्कोचे पथक राज्यात येणार आहे. गुरुवार दि. 26 सप्टेंबरपासून हे पथक राज्यात येत असून, राज्यातील किल्ल्यांची पाहणी झाल्यानंतर ते तामीळनाडूतील जिंजी किल्ला पाहणीस जाणार आहेत.