चिंचवडमध्ये जगताप-कलाटे- भोईर यांच्यात तिरंगी लढत

चिंचवड मतदारसंघात महायुतीचे बंडखोर नाना काटे, अरुण पवार यांच्यासह 7 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीचे राहुल कलाटे, भाजपचे शंकर जगताप आणि महायुतीचे बंडखोर उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. चिंचवड मतदारसंघात तब्बल 21 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे चिंचवडमध्ये दोन व्होटिंग मशीन लागणार आहेत. भोईर यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘यांनी’ घेतली माघार

अजित पवार गटाचे माजी नगरसेवक नाना काटे, अरुण पवार, संदीप चिंचवडे, शिवाजी पाडुळे, सीमा यादव, जितेंद्र मोटे, भरत महानवर या सातजणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

हे निवडणूक रिंगणात

शंकर जगताप, राहुल कलाटे, भाऊसाहेब भोईर, रफिक कुरेशी, सचिन सोनकांबळे, सचिन सिद्धे, अतुल समर्थ, अनिल सोनवणे, सतीश काळे, राजेंद्र काटे, विनायक ओव्हाळ, रुपेश शिंदे, रवींद्र पारधे, धर्मराज बनसोडे, मारुती भापकर, मयूर घोडके, सिद्दिक शेख, जावेद शेख, करण गाडे, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र पवार हे 21 जण निवडणूक रिंगणात आहेत.