हृदयाला जपण्याचा कानमंत्र , गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनच्या कार्डिओ-कॉन कॉन्फरन्सला एक हजार तज्ञांची उपस्थिती

जन्माच्या आधीपासून अथकपणे धडधडणाऱ्या हृदयाची काळजी कशी घ्यावी, त्याला तरुण कसे ठेवावे, कमी वयात येणारा हृदयविकार कसा रोखावा असा हृदय सांभाळण्याचा कानमंत्रच जगभरात प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील दहा नामवंत डॉक्टरांनी उपस्थितांना दिला. एक हजार डॉक्टरांच्या उपस्थितीत मधुमेह आणि रक्तदाबावर मात करण्यासाठी झटण्याचा निर्धार करतानाच गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनने मिशन फिट इंडियाचा नाराही दिला.

जागतिक हृदयदिनाचे औचित्य साधून डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनच्या वतीने सहार येथील हॉटेल ललित येथे कॉर्डिओ-कॉन 24 चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला महाराष्ट्रातील तब्बल एक हजाराहून अधिक डॉक्टर उपस्थित होते. यावेळी प्रख्यात सिनेकलावंत खासदार अरुण गोविल, मराठी सुपरस्टार अशोक सराफ, ख्यातनाम डॉ. प्रवीण सोनी, अष्टविनायक नाट्यसंस्थेचे निर्माते दिलीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विशाल कडणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे आणि मिशन फिट इंडियाचे उद्घाटन अरुण गोविल यांच्या हस्ते तर स्मरणिकेचे प्रकाशन अशोक सराफ यांनी केले.

डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. संजय रत्नपारखी, डॉ. ब्रह्मभट्ट, डॉ. अनिल शर्मा, डॉ. दर्शन झाला, डॉ. रमन गोयल, डॉ. पिंटो, डॉ. आनंद राव, डॉ. नितीन पाटणकर, डॉ. विवेक मेहान या जगभरात नावाजलेल्या सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांनी हृदय कसे जपावे याचा कानमंत्र देतानाच आधुनिक पद्धतीने हृदयशल्य क्रिया कशा करता येतील याचे ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने सादरीकरण केले. सूत्रसंचालन डॉ. स्मिता पाटील यांनी केले.

फाऊंडेशनच्या वतीने दरशनिवारी मोफत वैद्यकीय चिकित्सा करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यास गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. राम चव्हाण यांच्यासह डॉ. स्मृती रत्नपारखी, डॉ. राहुल रत्नपारखी, डॉ. प्रांजल रत्नपारखी, डॉ. ऋचा रत्नपारखी, डॉ. अनिलकुमार उलागडे, अंधेरी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक सिंग, विलेपार्ले मेडिकल क्लबचे अध्यक्ष डॉ. शशांक शहा, डॉ. प्रियंवदा शर्मा, डॉ. तेजस्विनी रत्नपारखी, सागर पांढरे, डॉ. शरद दधीच, डॉ. मोना गांधी, डॉ. समीर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.