50 वर्षांनी मिटला कोकणातल्या जमिनीचा वाद

कोकणातील जमिनीचा 50 वर्षांपूर्वी झालेल्या व्यवहाराचा वाद अखेर उच्च न्यायालयात मिटला. या व्यवहारासाठी तयार केलेला पेपर म्हणजे विक्री की विक्रीचा करार हा मुद्दा न्यायालयाने निकाली काढला. हा पेपर म्हणजे जमिनीची विक्री झाली, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

कणकवली येथील अनंत कांबळी यांनी भार्गव भोसले यांच्याकडून जमीन घेतली होती. 40 रुपयात हा व्यवहार झाला होता. 29 डिसेंबर 1973 रोजी या दोघांनी या व्यवहाराचा पेपर बनवला. त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या घेतल्या. दीपक भार्गव भोसले व अन्य यांनी कणकवली नगर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला. भार्गव यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचा गैरफायदा घेत कांबळी यांनी व्यवहाराचा पेपर बनवला. या जमिनीत कांबळी यांनी हस्तक्षेप करू नये, अशी मागणी दिवाणी न्यायालयात करण्यात आली. दिवाणी न्यायालयाने भोसले यांचा अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात भोसले यांनी अपील दाखल केले. अपील न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा निकाल फिरवला. त्याला कांबळी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल होते.