
पुण्यातील एसटी स्टॅण्डमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. पण फक्त कायदे करून महिला सुरक्षित होणार नाही असे विधान देशाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे.
चंद्रचूड म्हणाले की, फक्त कायदे करून असे कायदे करून अशा घटना थांबणार नाही, महिलांसाठी जे कायदे केले आहेत त्यांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. महिला जिथे कुठे असतील त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. तसेच अशा प्रकरणात योग्य तपास, कडक कारवाई, तत्काळ सुनावणी आणि वेळेत शिक्षा होणे गरजेचे आहे. महिला सुरक्षेसाठी पोलीस आणि न्याय व्यवस्थेची मोठी जबाबदारी आहे असेही चंद्रचूड म्हणाले.