
सोनाक्षी सिन्हा ही बाॅलीवूडमधील दबंग गर्ल म्हणून ओळखली जाते. बाॅलीवूडमध्ये तब्बल दहापेक्षा अधिक वर्षे सोनाक्षीने काम केलेलं आहे. सोनाक्षी ही कायम तिच्या फिटनेस जर्नीसाठी चर्चेत राहिली आहे. सोनाक्षीचं वाढलेले वजन आणि त्यानंतर तिचं ट्रान्सफाॅरमेशन हा कायम चर्चेचा विषय राहिला. परंतु याच सोनाक्षीला हिंदुस्थनात स्विमिंग काॅस्ट्यूम घालायला मात्र अवघडल्यासारखे वाटत असल्याचे नुकतेच तिने माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
काय म्हणाली सोनाक्षी सिन्हा?
मुलाखतीमध्ये सोनाक्षी म्हणाली, की मला हिंदुस्थानामध्ये स्विमिंग सूट घालायला लाज वाटते, अवघडल्यासारखे होते. त्यामुळे मी कधीही भारतात स्विमिंग सूट घालत नाही. सांगता येत नाही कोण कधी कुठून फोटो काढेल. म्हणूनच मी मुंबईत किंवा हिंदुस्थानात कुठेही स्विमिंग सूट घालणे पसंत करत नाही. त्यामुळेच आपल्या देशात मी पोहण्यासाठी पूलमध्ये उतरत नाही.
सोनाक्षीची फिटनेस जर्नी
सोनाक्षीचा बाॅलीवूडमधील प्रवेश वजन वाढलेले होते त्याचवेळी झालेला होता. पण त्यानंतर तिने स्वतःमध्ये केलेले बदल खूपच वाखाणण्याजोगे होते. यावर बोलताना सोनाक्षी म्हणते, मी वजनाचा कधीच स्ट्रेस घेतला नव्हता, म्हणूनच वयाच्या अठराव्या वर्षी मी जिमची पायरी चढले होते. पण त्यानंतर या क्षेत्रात काम करण्यासाठी मात्र नंतर मी फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले.
झहीर इक्बाल सोबत सोनाक्षी सिन्हाने केलेले लग्न हे चर्चेत होते ते दोन्ही धर्म वेगळे असल्यामुळे. परंतु याबाबतही सोनाक्षीने स्पष्टीकरण दिले असून, ती म्हणाली की आम्ही दोन्ही धर्मांचा आणि संस्कृतीचा आदर करतो. माझ्याकडे दिवाळीची पूजा असल्यावर तो पूजेला बसतो. त्याच्या घरी असले की, मी नियाजला बसते. माझ्यासाठी हेच पुरेसे आहे असे म्हणत सोनाक्षीने धर्म बदलण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.