
पंजाब-हरयाणाच्या खानौरी सीमेवर 13 दिवसांपासून उपोषणाला बसलेले जगजीत सिंग डल्लेवाल आजारी पडले असून त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना तब्बल 103 डिग्री ताप आला. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. त्यांच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवून ताप कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.