
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ पुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. यावेळी सिंहस्थ पुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सादरीकरण केले.