
बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी आता विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी कालपासून सुरू केलेले आंदोलन स्थगित केले.