
सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवांतर्गत चेंबूर येथे आयोजित बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये विविध गटांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि उत्पंठावर्धक सामने रंगले. खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकली.
शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण-मध्य मुंबईत सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत सुरू असलेल्या बॅडमिंटन आणि टेबल टेनिस स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभाला विधानसभा संघटक महेंद्र नाकटे, उपविभागप्रमुख प्रशांत म्हात्रे, किरण लोहार, शाखाप्रमुख अशोक वीर, राजेश दौंडकर, सचिन भोसले, युवासेना विभाग अधिकारी दीपेश चव्हाण उपस्थित होते. स्पर्धेच्या दुसऱया दिवशी पारितोषिक वितरण सोहळा मोठया दिमाखात संपन्न झाला. विभागप्रमुख प्रमोद शिंदे, सह संघटक संजय मोरे, माजी नगरसेवक रामदास कांबळे, शाखाप्रमुख गणेश पाटील, उपविभाग अधिकारी रूपेश मढवी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
n टेबल टेनिस स्पर्धेतील विजेते – शारंग भागदिकार (विजेता), राजू यादव (उपविजेता).
n बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते – ऋषिका पाल, तिर्तेश (अंडर 15 गट), वेदिका, ओम (अंडर 19 गट), श्वेतांक कर्णिक (मेन्स सिंगल), सिद्धेश / अर्जुन (मेन्स डबल), अर्जुन / ऐक्यदा (मिक्स डबल्स), धीरेंद्र / जसविंदर ( 35 प्लस डबल्स).