उज्जैनच्या महाकाल मंदिरात 165 कोटींची देणगी

महाकाल मंदिरात भक्तांनी भरभरून दान केले असून भाविकांनी 165 कोटींची देणगी दिली आहे. दानपेटीत 399 किलो चांदी आणि 1533 ग्रॅम सोने दान म्हणून केले आहे. महाकाल मंदिरात भाविक मोठ्य़ा प्रमाणात दान करत आहेत. या ठिकाणी 40 ते 50 हजार भाविक दर्शनासाठी येत होते, परंतु आता हा आकडा दररोज दीड ते दोन लाख भाविकांवर पोहोचला आहे. त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नातही तिपटीने वाढ झाली आहे. महाकाल मंदिरतला लाडू प्रसाद प्रसिद्ध आहे.