भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांना आज दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच हॉस्पिटलकडून हेल्थ बुलेटिन जारी करण्यात येणार आहे.
लालकृष्ण अडवाणी हे 97 वर्षांचे आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांत उपचारासाठी त्यांना अनेकवेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. काही कालावधीपासून अडवाणी हे आरोग्याच्या समस्यांचा सामना करत आहेत. अडवाणी यांना यावर्षी देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला होता.
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 ला कराचीत झाला. 1942 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळले. 1986 ते 1990, त्यानंतर 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 पर्यंत ते भाजपचे अध्यक्ष होते. पक्षाचे सर्वाधिकाळ अध्यक्ष राहिले आहेत. अटबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते.