सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने युजर्ससाठी विंटर बोनांझा ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत युजर्सला 1 हजार 999 रुपयांमध्ये 6 महिन्यांसाठी भारत फायबर ब्रॉडबँड सेवा देणार आहे. यात हायस्पीड डेटा मिळणार आहे. यात युजर्सला 25 एमबीपीएसच्या स्पीडने दरमहिन्याला 1300 जीबी डेटा देत आहे. तसेच डेटा लिमिट संपल्यानंतर यूजर्स 4 एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड इंटरनेटचाही कॉलिंगचा फायदा मिळतो. हा ब्रॉडबँड प्लान सर्व टेलिकॉम सर्कलसाठी उपलब्ध आहे.