देशात भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) ची 1 हजार 316 आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)ची 586 पदे रिक्त आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली. खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. 1 जानेवारी 2024 पर्यंत 6 हजार 858 आयएएसच्या एकूण संख्येपैकी 5 हजार 542 अधिकारी कार्यरत होते. तर 5055 च्या एकूण संख्येपैकी 4469 आयपीएस अधिकारी कार्यरत होते. आयएएसच्या 1316 रिक्त पदांपैकी 794 थेट भरतीसाठी आणि 522 पदे प्रमोशनची पदे आहेत. आयपीएसच्या 586 पदांपैकी 209 थेट भरती आणि 377 प्रमोशनची पदे रिक्त आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.