साताऱ्यातील कास परिसरात रेव्ह पार्टी, बारबाला अन् राडा; पोलिसांची डोळेझाक

सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जावळी तालुक्यातील कास परिसरात एका हॉटेलवर रेव्ह पार्टी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रेव्ह पार्टीमध्ये बारबाला नाचवल्या गेल्या. कहर म्हणजे हुल्लडबाजांनी पार्टीमध्ये दारु पिऊन धिंगाणा घातला असून बाराबालांसोबत अश्लील नृत्य करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कास परिसरातील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी पार पडली. या रेव्ह पार्टीमध्ये बारबारालांना बोलवण्यात आले होते. त्यांच्यासोबत अश्लील पद्धतीने नृत्य करण्यात आले. तसेच या ठिकाणी हाणामारी सुद्धा झाली असून तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे मागील तीन दिवसांपासून या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत होत असूनही पोलिसांनी कोणतीही अ‍ॅक्शन घेतलेली नाही. त्यामुळे पोलिसांचा कार्यतत्परतेवर प्रश्चचिन्ह निर्माण केले जात आहे. ABP माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे.