न्यायासाठी शेवटचा आशेचा किरण मानल्या जाणाऱया न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेला तडा जाणारी धक्कादायक घटना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच घडली आहे. जामीन देण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय लक्ष्मण निकम यांनी पाच लाख रुपये मागितले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करताना न्यायाधीश निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.