परभणीतल्या आरोपीला अटक, पोलिसांनी केले शांततेचे आवाहन

परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करण्यात आला होता. त्यानंतर या भागात हिंसाचार उसळला होता. पोलिसांनी इथली परिस्थिती ताब्यात घेतली असून आतापर्यंत 50 जणांना अटक केली आहे.

पोलीस अधिकारी शहाजी उमप म्हणाले की, परभणीतली परिस्थिती ताब्यात आहे. ज्या लोकांनी नासधूस केली आहे, त्यांना ताब्यात घेतले असून जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकसमोर सादर करण्यातल आले आहे. तसेच पोलिसांनी परिस्थिती ताब्यात घेतली आहे. आतापर्यंत 50 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.

या घटनेच्या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला जमावाने जबर मारहाण केल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात सर्वांनी शांतता राखावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.