बंडखोरांच्या गटाचा प्रमुख अबू मोहम्मद अल-जुलानी याने देशावर ताबा मिळवताच सीरियाचे शुद्धीकरण होत असल्याने म्हटले. सीरियाची ड्रग्ज संबंधीची ओळख पुसून टाकण्याबद्दल त्याने हे विधान केले. असद यांच्या राजवटीत सीरिया हा क@पटागॉन या अमली पदार्थांचा सर्वात मोठा स्रोत बनला होता, असेही जुलानीने नमूद केले. दरम्यान, अमेरिकेने सीरियात असद सरकार पडल्याचे स्वागत केले.
सीरियात मागील 11 दिवसांपासून गृहयुद्ध पेटले आहे. बंडखोरांनी सीरियाच्या लष्करावर मात केली आणि महत्त्वाच्या शहरांवर कब्जा केला. असद यांनी सीरियातून पळ काढताच नागरिकांनी जल्लोष करत त्यांच्या महालाची तोडफोड केली. दुसरीकडे, हिंदुस्थान सीरियातील घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तेथील घडामोडी पाहता सीरियाच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची गरज आहे. तेथील जनतेचे हित लक्षात घेऊन राजकीय प्रक्रिया शांततेने पार पाडली पाहिजे, असे आवाहन हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले.
दरम्यान, सीरिया बंडखोरांच्या ताब्यात जाताच अमेरिकेने सीरियातील आयसिसच्या अड्डय़ांना लक्ष्य केले. किमान 75 तळांवर अमेरिकेने हवाई हल्ले केले.