राज्यपाल करतो असे सांगून व्यावसायिकाला पाच कोटींचा गंडा; नाशिकमध्ये एकाला अटक

राजकीय नेत्यांच्या ओळखीतून राज्यपाल करतो, असे सांगून नाशिकमधील एकाने चेन्नईतील व्यावसायिकाला पाच कोटींचा गंडा घातला. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तामीळनाडूतील थिरुवन्मीयुर येथील नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी (56) हा जानेवारीत नाशिकमध्ये आला होता. हॉटेल कोर्टयार्ड येथे त्याची नाशिकरोड येथील रहिवाशी निरंजन कुलकर्णी याच्याशी ओळख झाली. आपली राजकीय नेत्यांशी ओळख आहे, कोणत्याही राज्याचा राज्यपाल म्हणून मी तुला नियुक्त करू शकतो, त्यासाठी एकूण पंधरा कोटी रुपये लागतील, आधी पाच कोटी रुपये दे, काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम दे, असे त्याने रेड्डी याला सांगितले. मात्र, काम झाले नाही, पैसेही परत मिळत नसल्याने रेड्डी यांनी पोलिसात तक्रार केली.