कुवेतमध्ये अडकले 60 हिंदुस्थानी

कुवेत विमानतळावर रविवारी 60 हिंदुस्थानी नागरिक तब्बल 24 तास अडकले. हे सर्व जण मुंबईत इंग्लंडमधील मॅन्चेस्टरला जात होते. विमातळ प्रशासनाने या प्रवाशांकडे डोळेझाक करत त्यांना गल्फ एअरवर अन्न, पाणी आणि निवासाशिवाय बसून ठेवल्याचा आरोप आहे. यूके, युरोपियन युनियन आणि यूएसमधील प्रवाशांना राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु, हिंदुस्थान, पाकिस्तान आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांतील प्रवाशांना कोणतीही मदत दिली गेली नाही.