आयआयटी मद्रासच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना मोठय़ा ऑफर्स मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांना 40 लाखांपासून 1 करोड पॅकेजच्या नोकऱ्या चालून आल्या आहेत. इतकेच नव्हे तर एका विद्यार्थ्याला 4.3 कोटींचे वार्षिक पॅकेज मिळालंय. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वॉल स्ट्रीट ट्रेडिंग फर्मने आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्याला 4.3 कोटी रुपयांचे पॅकेज दिले. या ऑफरमध्ये बेस सॅलरी, फिक्स्ड बोनस आणि रिलोकेशन बेनिफिट्स यांचा समावेश आहे. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग फर्मने अन्य एका आयआयटी विद्यार्थ्याला प्री प्लेसमेंट ऑफर दिली. ब्लॅकरॉक, ग्लेन, डाटाब्रीक्स, इबूलीयन्ट सिक्युरीटीज, आयएमसी ट्रेडींग कॉन्टबॉक्स आणि दा विन्सी या कंपन्यांनी दोन करोड पेक्षा जास्तीच्या पॅकेजची ऑफर दिली. अन्य काही कंपन्यांनी विद्यार्थ्यांना 66 ते 70 लाख, तर काहींना 75 लाख पॅकेज देऊ केले आहे.