अखेर आठवड्याभरानंतर महायुतीला मुहूर्त सापडला; मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप गुलदस्त्यात

महाराष्ट्र विधानसभेचे निकाला जाहीर होऊन आठवडा उलटल्यानंतर अखेर महायुतीला शपथविधी सोहळ्यचा मुहूर्त साडला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदान येथे संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. महायुतीला शपथविधीचा मुहूर्त सापडला असला तरी अद्याप मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.