वाराणसी रेल्वे स्थानकात पार्किंगमध्ये भीषण आग; 200 मोटरसायकल जळून खाक

उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या कँट रेल्वे स्थानकाच्या वाहन पार्किंग परिसरात शनिवारी भीषण आग लागली. या आगीत पार्किंगमधील सुमारे 200 मोटरसायकल जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते आणि आग विझवण्याच्या कामाला सुरुवात केली. या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले. या भीषण आगीत सुमारे 200 मोटरसायकल भस्मसात झाल्या.या आगीने परिसरात धुराचे लोट दिसत होते.

आग विझवण्यासाठी सुमारे 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. रेल्वे राखीव दलाचे पोलीस (जीआरपी), रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि स्थानिक पोलिसांच्या पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. याआगीत कोणतिही जिवीतहानी झाली नाही. मात्र, 200 मोटसायकल भस्मसात झाल्या आहेत.ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या आगीत काही मोटरसायकल जळून खाक झाल्या आहेत.ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. आम्ही पुढील तपास करत आहोत,असे सीओ जीआरपी कुंवर बहादूर सिंग यांनी सांगितले. या आगीत जळालेल्या बहुतांश दुचाकी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाले होते. त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, शनिवारी सकाळी पुन्हा शॉर्ट सर्किट झाले आणि आग लागली आणि लगेचच ती पूर्ण पार्किंग परिसरात पसरली. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाचे जवान आले आणि त्यांनी अथक परिश्रमाने दोन तासांनंतर आग आटोक्यात आणली.