ECB ने पाकिस्तानला दिला झटका, इंग्लंडचे खेळाडू PSL मध्ये खेळणार नाहीत

पाकिस्तान आणि अडचणी अस जणू समीकरणच निर्माण झाले आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरून वारंवार चर्चेत आहे. अशातच आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानला मोठा झटका दिला असून इंग्लंडने आपल्या खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2025) खेळण्यास बंदी घातली आहे.

देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्सोहान देण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने आता देशांतर्गत स्पर्धा सुरू असताना इंग्लंडचे खेळाडूंना परदेशी लीगमध्ये सहभागी होता येणार नाही. इंग्लंडमध्ये व्हिटॅलिटी ब्लास्ट आणि द हंड्रेड या टी-20 स्पर्धा पार पडणार आहे. याच दरम्यान पीएसएल सुद्धा होणार आहे. त्यामुळे ECB ने निर्णय जाहीर करत देशांतर्गत स्पर्धा सुरू असताना परेदशी लीगमध्ये खेळण्यास इंग्लंडच्या खेळाडूंना बंदी घातली आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चांगलाच फटका बसणार आहे. मात्र, IPL ला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाचा कोणताही फटका बसणार नाही. तसेच इंग्लंडचे सर्व खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशांतर्गत स्पर्धेची गुणवत्ता वाढेल, सर्व खेळाडू स्पर्धेसाठी उपलब्ध असतील त्यामुळे त्याचा नवीन खेळाडूंना चांगला फायदा होईल. इंग्लंडच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि चांगले खेळाडू तयार करण्यासाठी हा निर्णय फायद्याचा ठरेल, असा ECB ला विश्वास आहे. त्यामुळे इथून पुढे इंग्लंडमध्ये देशांतर्गत स्पर्धा सुरू असेल, तर इंग्लंडचे खेळाडू इतर कोणत्याही परदेशी लीगमध्ये खेळताना दिसणार नाहीत.