एक डाव अन् 11 गोलंदाज; T20 क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद करणारा दिल्ली ठरला पहिलाच संघ, वाचा सविस्तर…

Syed Mushtaq Ali Trophy 2024 मध्ये दिल्ली आणि मणिपुर या संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीच्या सर्व म्हणजेच 11 खेळाडूंनी गोलंदाजी करत इतिहास रचला आहे. असा विक्रम करणारा दिल्ली हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पहिलाच संघ ठरला आहे.

वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्लीने मणिपुरचा चार विकेटने पराभव केला आहे. मणिपुरने प्रथम फलंदाजी करताना 8 गड्यांच्या मोबदल्यात 120 धावा केल्या होत्या. तर, दिल्लीने 6 विकेट गमावत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. मात्र, हा सामना दिल्लीच्या गोलंदाजीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कर्णधार आयुष बडोनीच्या नेतृत्वात दिल्लीच्या संघाने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. प्रथम गोलंदाजी करताना दिल्लीच्या सर्व 11 खेळाडूंनी गोलंदाजी केली. दिल्लीच्या पाच गोलंदाजांनी 1-1 षटक टाकले तर तीन गोलंदाजांनी 3-3 आणि बाकी तीन गोलंदाजांनी 2-2 षटके फेकली. असा विक्रम करणारा दिल्ली हा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पहिलाच संघ ठरला आहे.