दक्षिण आणि बॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने एक वाईट बातमी शेअर केली आहे. समंथा रुथ प्रभू हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच अभिनेत्रीचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाले. स्वत: समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
समंथा रुथ प्रभूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. बाबा पुन्हा भेटेपर्यंत… असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. यासोबतच अभिनेत्रीने तुटलेल्या हृदयाची इमोजीही टाकली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. समंथाच्या वडिलांच्या निधनामुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काही महिन्यांपूर्वीच समंथाने तिच्या वडिलांबाबत गलाट्टा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं होतं. माझे वडील इतरांच्या वडिलांसारखेच आहेत. त्यांना वाटते की ते माझे संरक्षण करत आहेत. कारण त्यांना वाटते की मी जास्त स्मार्ट नाही, असे तिने सांगितले.
समंथा रुथ प्रभू गेल्या काही काळापासून तिच्या आयुष्यातील काळाताचा सामना करत आहे. अभिनेत्रीने 2021 मध्ये तिचा पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला. तेव्हापासून त्यांचे जीवन अनेक चढउतारांमधून गेले. त्याच वेळी, अभिनेत्रीच्या वडिलांवर देखील याचा मोठा प्रभाव पडला. यासाठी त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक कविता लिहिली होती. ‘खूप वर्षांपूर्वी एक कथा असायची आणि आता ती कुठेच नाही. चला तर मग एक नवीन कथा, आणि एक नवा अध्याय लिहूया, असे त्यांनी लिहिले होते.