गेल्या काही दिवसांपासून व्यायाम करताना व्यायामशाळेत अनेकांना हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता ब्राझिलीअन प्रसिद्ध शरिरसौष्ठवपटू आणि फिटनेस उद्योजक जोस मॅट्युस कोरिया सिल्वा याचे वयाच्या 28 व्या वर्षी व्यायामशाळेत व्यायाम करताना मृत्यू झाला आहे.
द न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, जोस मॅट्युस कोरिया सिल्वा याचा ब्राझिलियातील अगुआस क्लारास येथील जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि तो व्यायामशाळेतच कोसळला. त्याच्या एका मित्राकडून वाचविण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याला वाचवता आले नाही. तो बॉडीबिल्डरबरोबरच वकील, पोषणतज्ज्ञ आणि फिटनेस उद्योजक देखील होता.
जोस मॅट्युस कोरिया सिल्वा याचा भाऊ टियागो याने एका निवेदनाद्वारे ज्यांनी त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. ते सर्व अतिशय व्यावसायिक होते आणि त्यांनी सर्व सहकार्य दिले. जोसला कोणताही पूर्ण आजार नव्हता, असे त्याचा भाऊ टियागो याने म्हटले आहे. जोस बॉडिबिल्डींग क्षेत्रात प्रसिद्ध होता. दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिपसारख्या शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रसिद्ध होता.