ईव्हीएमशी छेडछाड केली आणि मतं वाढवण्यात आली असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. तसेच यावर सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोगाने मौन धारण केले आहे असेही सावंत म्हणाले.
#WATCH | Delhi | On EVMs, Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant says, “The fact remains that – the machine works as per the input given by the people. There have been issues in this election, where the 17C form given by the presiding officer states that so many votes will be there in… pic.twitter.com/d4Q4VCuPKN
— ANI (@ANI) November 29, 2024
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सावंत म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने मशीनला जसे इनपुट दिले तसे मशीन चालते. या निवडणुकीत काही मुद्दे समोर आले आहेत. फॉर्म 17C नुसार भरपूर मतदान झाल्याचे प्रेसिडिंग अधिकाऱ्यांनी सांगितले. पण मशिनमधील मते त्याहून अधिक वाढवण्यात आली. याचा अर्थ मशीनसोबत छेडछाड केली आहे. ईव्हीएमच्या दुरुपयोगावर सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोगाने मौन धारण केले आहे. फक्त काँग्रेस आणि शिवसेनाच नव्हे तर भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनीही ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. सत्ताधारी पक्षाकडून पैशांचा आणि यंत्रणांचा गैरवापर केला गेला आहे असा आरोपही सावंत यांनी केला.