हिवाळ्यात घसा खवखवणे टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय

वातावरण बदललं की, सर्दी, खोकला, घसादुखीचा त्रास होऊ शकतो. वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता सतत खालावत असल्याने लोकांना श्वासोच्छवास, सांधे आणि घशाशी संबंधित समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यातच खोकला, सर्दी आणि घसा खवखवणे अशा काही समस्या आहेत, ज्या दरवर्षी हवामान बदलत असताना कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना त्रास देतात. अशातच जर तुम्हालाही हवामानातील बदलामुळे घसादुखीचा त्रास होत असेल तर या हेल्थ टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

हायड्रेटेड रहा

घसा खवखवणं बरं व्हावं म्हणून शरीर हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारच्या आरोग्यदायी पेयांचा समावेश करू शकता. घशातील आर्द्रता राखून खोकल्यामुळे होणारी चिडचिड कमी करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही हर्बल चहासोबत लिकोरिस चहा, गरम पाणी आणि मध पिऊ शकता.

मस्तचा वापर करा

प्रदूषणामुळे घसा खवखवणे टाळण्यासाठी N95 सारखे चांगल्या दर्जाचव दर्जाचे मास्क वापर. मास्क फिल्टरसह येतात आणि प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी देखील सर्वात प्रभावी असतात.

गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा

प्रदूषणामुळे घसा खवखवणे टाळण्यासाठी आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा. हे मुख्यतः सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा करा. यावेळी धुके सर्वाधिक असते. याशिवाय धूम्रपान, मद्यपान आणि मसालेदार अन्न टाळा.