वायनाडमध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी आघाडीवर असून त्या प्रचंड बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सध्या त्या 4 लाख मतांनी आघाडीवर आहेत. राजकीय कारकिर्दीतील त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यात त्या प्रचंड बहुमत मिळवताना दिसत आहे. त्यांची लढत भाकपचे ज्येष्ठ नेते सत्यन मोकेरी आणि भाजपच्या नव्या हरिदास यांच्याशी होती. त्या आता बहुमताच्या आकड्यांमध्ये राहुल गांधी यांनीही मागे टाकतील अशी शक्यता दिसत आहे.
वायनाडमध्ये प्रियांका गांधी यानांही राहुल गांधी यांच्यासारखे प्रचंड बहुमत मिळवता येईल का, याची राजकीय वर्तुळात चर्चा होत होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी 4,31,770 मतं मिळवली होती. तर 2024 मध्ये 3,64,422 मतं मिळवली होती. राहुल गांधी अमेठी आणि वायनाड या दोन्ही जागांवर विजयी झाल्याने त्यांनी वायनाडची जागा सोडली होती. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसने या जागेवरून प्रियांका गांधी यांना उमेदवारी दिली होती. राजकारणात प्रवेश करणाऱ्या नेहरू- गांधी परिवातील त्या 10 व्या सदस्य आहेत. तर राजकारणात येणाऱ्या परिवातील त्या चौथ्या महिला आहेत.
सध्या प्रियांका गांधी 4 लाख मतं मिळवल्याने त्यांनी 2024 मधील राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त मतं मिळवली आहेत. तर त्या आता 2019 मधील राहुल गांधी यांच्या जास्त मतं मिळवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.