महाराष्ट्रात भाजप महायुती जिंकली असली तरी झारखंडमध्ये इंडिया आघाडीने धुव्वाँ उडवला आहे. हेमंत सोरेन यांनी जोरदार कमबॅक कले आहे. झारखंडमध्ये सोरेन यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे.
या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने राज्यात 34 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसनेही 17 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपचा रथ अवघ्या 20 जागांवर अडला आहे. झारखंडमध्ये 81 जागा असून इंडिया आघाडीला 50 हून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे झारखंडमध्ये हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री होतील असे सांगितले जात आहे.