महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महेश सावंत ‘जायंट किलर’ ठरले आहेत. महेश सावंत यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा पराभव केला.
माहीम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. याच मतदारसंघामध्ये शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी गाजलेले छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या मतदारसंघातील लढतीकडे लक्ष लागले होते.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेश सावंत, शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि मनसेचे अमित ठाकरे हे तीन प्रमुख उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघावरून भाजप-शिंदे गटामध्ये कुणाला पाठिंबा द्यायचा यावरून वादही झाला. तर दुसरीकडे मनोज सावंत यांनी नियोजनबद्ध प्रचार करत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचले. याचाच फायदा त्यांना झाला.
माहीम मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महेश सावंत विजयी
निकालाचे सर्व अपडेट वाचण्यासाठी क्लिक करा – https://t.co/4JVoVdubZi#MaharashtraElection2024 #ElectionResults pic.twitter.com/w1XmuM3eZ0
— Saamana Online (@SaamanaOnline) November 23, 2024