शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी बुलढाण्यातली मेहकर येथे जाहीर सभा पार पडली. तुफान गर्दी झालेल्या या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मिंधे भाजप सरकारला जोरदार फटकारले आहे. जर माझ्या शेतकऱ्याने पिकवलेल्या सोन्याला कचऱ्या पेक्षा कमी भाव मिळत असेल तर हे अख्खं सरकार कचराकुंडीत टाकण्यासारखं आहे. द्या कचराकुंडीत टाकून, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.
”मी शेतकरी नाहिए. पण माणूस आहे. शेतकऱ्याचे दुख कळण्याइतकी माणूसकी माझ्यात आहे. हे सरकार यांनी पाडलं नसतं तर कदाचित मी या पाचव्या वर्षीही शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं असतं. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सोयाबीन व कापसाला भाव जास्त होता. आता सोयाबीन कापसाच्या दरांवरून सर्व शेतकरी रडत आहेत. हे सरकार आयात शुल्क माफ करून खाद्य तेल आयात करत आहेत. त्यामुळे सोयाबिनचा भाव पडतोय आणि शेतकरी रडतोय. शेतीसाठी लागणारा खर्च वाढत चालला आहे. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागतोय. तुम्ही जे सोनं पिकवता त्याला भाव देताना यांची खरी वृत्ती दिसते. या सगळ्या अन्यायाच्या विरुद्ध यांना घरचा रस्ता दाखविण्याशिवाय पर्याय नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
”आता येताना मध्ये चिखली महानगरपालिकेच्या एका निर्णयाविषयी समजले. चिखली नगरपालिकेने कचरा उचलण्याचे टेंडर काढले आहे. एक किलो कचरा उचलायचा 35 रुपये, सोयाबिन एक किलोला 30 रुपये. कचऱ्याला सुद्धा तुम्ही पिकवलेल्या सोन्यापेक्षा जास्त भाव देतायत. सोयाबिन पेक्षा कचरा महाग असेल तर सोयाबिन नेऊन टाका जिल्हाधिकाऱ्याकडे. जर माझ्या शेतकऱ्याने पिकवलेल्या सोन्याला कचऱ्या पेक्षा कमी भाव मिळत असेल तर हे अख्खं सरकार कचराकुंडीत टाकण्यासारखं आहे. द्या कचराकुंडीत टाकून, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.