विकासासाठीच भाजपसोबत, वादानंतर छगन भुजबळ यांची सारवासारव

ईडीपासून सुरक्षा मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो होतो असे विधान छगन भुजबळ यांनी पत्रकार लेखक राजदीप सरदेसाई यांच्याकडे केले होते. सरदेसाई यांनी हे विधान आपल्या पुस्तकात नमूद केले होते. पण भुजबळांनी हा दावा फेटाळून लावला आहे. विकासासाठी आपण भाजपसोबत गेलो, मतदारसंघात विकासकामं करता आली अशी सारवासारव भुजबळांनी केली.

आज पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ म्हणाले की, ईडीपासून सुटका मिळावी म्हणून भाजपसोबत गेलो असा आरोप आमच्यावर होत आहे. पण हा आरोप खोटा आहे. कोर्टाने मला महाराष्ट्र सदन प्रकरणात क्लीन चीट दिली आहे. तुरुंगात जाण्याची मला भीती होती हा दावाही खोटा आहे. आमच्याबोत 54 आमदार आले. पण सगळ्यांवर ईडीचा चौकशी नव्हती. आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो, त्याचा विकासासाठी आम्हाला फायदा झाला असेही भुजबळ म्हणाले.