रेड झोनची टांगती तलवार, अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, खड्डे पडलेले रस्ते आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून तळवडेतील नागरिक वैतागले आहेत. सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे म्हणाले.
अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ तळवडे भागामध्ये पदयात्रा काढण्यात आली. तळवडेचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांना श्रीफळ वाढवून भैरवनाथांच्या चरणी दंडवत घालत गव्हाणे यांनी नाथसाहेबांचा आशीर्वाद घेतला. गव्हाणे यांनी तळवडेतील ज्योतिबा मंदिरातही दर्शन घेतले. पदयात्रेला माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, रवी लांडगे, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे,धनंजय आल्हाट, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय भालेकर, रवींद्र सोनवणे, चिंतामण भालेकर, विकास साने, शीला शिंदे, दादासाहेब नरळे, रावसाहेब थोरात, सुखदेव नरळे, नितीन भोंडे, गणेश भिंगारे, राहुल पवार, संजय चव्हाण, प्रवीण पिंजन, खंडू भालेकर, राजू कहार, प्रकाश गाडे, रमेश बाठे, लक्ष्मण कामटे, के. डी. वाघमारे, दिनकर भालेकर, शिवाजी नखाते, अंकुश नखाते, संतोष केकाळे, लक्ष्मण हगवणे, रंगनाथ भालेकर, जयश्री बाठे, सीमा पिंजन आदी उपस्थित होते.
गव्हाणे म्हणाले, ‘तळवडेत मोठ्या प्रमाणात लघु उद्योग आहेत. लघुउद्योजक रस्ते आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. या परिसराचा गेल्या दहा वर्षांत विकास होऊ शकला नाही. दररोज वाहतूककोंडीची समस्या जाणवते. आगामी काळात हाच विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे, असे गव्हाणे म्हणाले.
रेडझोन प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांची डोळेझाक
गेल्या दहा वर्षांत तळवडे भागाला निधी देण्यात दुजाभाव केला गेला. तळवडेमध्ये अनेक भूमिपुत्र रेडझोनमुळे बाधित आहेत. या रेडझोन प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांनी डोळेझाक केली. गेल्या दहा वर्षांत त्यांनी रेड झोनचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणता पुढाकार घेतला नसल्याचे माजी नगरसेवक पंकज भालेकर म्हणाले.